टार्गेट जरा जास्त आहे . . . दर वर्षी वाटतं
सर्वांदेखत डोळ्यात येऊन पाणी मनात दाटतं
तरी पावलं चालत रहातात . . . मन चालत नाही
तणावा शिवाय मनामधे काहीच सुचत नाही
MR उनाड मुलासारखा सैरावैरा पळत रहातो
डेंटिस्ट , Gynac , CP , GP , कुणालाही भेटत राहतो
तितक्यात कुठून गिफ्ट्स चा धुंवाधार येतो
बर्फासारखं तणाव विरघळून नेतो
मेहेनतीसंगं रंगतो कॉकटेल पार्टीचा खेळ
चालून येते धो धो धंदा मागायची वेळ
चक्क डोळ्यांसमोर सेल कुस बदलून घेतो, भुईवरचा पत्ता आभाळाशी नेतॊ
धंद्याचा सुकाळ डोळयांसमोर येतो, टार्गेट मधला आकडा अचिव्हमेंट मधे जातो
- एक M R

--