Blog Archive

घोका आणि ओका

आयुष्यात कधी डायरी लिहीली नाही...

१० वी बोर्डाच्या परिक्षेतला पेपर लिहिल्यानंतर, मराठी लिखाणाशी असलेला ( सक्तीचा ) संबंध संपला...

लिहायचे कशासाठी ? . . . तर मार्क मिळवण्यासाठी ...

१५ निबंधाचे आणि १० पत्रलेखनाचे अशी शाळेने मनापासुन समजुत करुन दिलेली...

त्यातुनही जर मनातले काही लिहावे, तर मास्तर लाल शाईने वही सजवायचा...

शाळेने शिकवला एकच धडा . . . ' गाईड घोका आणि पेपरावर ओका '

इथे मात्र हे काही नाही . . . गाईड नाही आणि पेपरही नाही ...


परिस्थिती मोठी कठीण आहे!!!